Ad will apear here
Next
‘सनदी लेखापालांमुळे ‘जीएसटी’ संकलनात मोठी वाढ’
‘सीजीएसटी’ आयुक्त कृष्णा मिश्रा यांचे प्रतिपादन

पुणे : ‘वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठीच आणलेला आहे. त्यामध्ये सुधारणेला वाव असून, त्यासाठी जीएसटी कौन्सिल नियमित बैठक घेऊन ‘जीएसटी’ला ‘गुड अँड सिम्पल टॅक्स’ बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ‘जीएसटी’मुळे कर संकलनात मोठी वाढ झाली आहे,’ असे प्रतिपादन ‘सीजीएसटी’च्या मुख्य आयुक्त कृष्णा मिश्रा यांनी केले.

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वतीने ‘जीएसटी’वर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कोथरूड येथील ‘एमआयटी’च्या स्वामी विवेकानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी ‘सीजीएसटी’चे आयुक्त राजीव कपूर, ‘आयसीएआय’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष अतुल गुप्ता, केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे, पुणे शाखेच्या अध्यक्षा ऋता चितळे, ‘आयसीएआय’चे सुशीलकुमार गोयल, राजेंद्र कुमार, यशवंत कासार, आनंद जाखोटिया, समीर लड्डा, अभिषेक धामणे, काशिनाथ पठारे, यशवंत कासार आदी मान्यवर उपस्थित होते. 

राजीव कपूर म्हणाले, ‘ऑनलाइन जीएसटी भरण्यात तक्रारी येत आहेत. त्यांना त्वरित मदत करणे गरजेचे आहे. ‘सब का विश्वास’ अंतर्गत अभियान सुरू आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जीएसटी भरणा करून करदात्यांनी सरकारला सहकार्य केले पाहिजे. बोगस जीएसटी बिल काढण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यांना पकडणे सहज शक्य आहे. प्रत्येकाला एकाच छत्राखाली घेऊन येणे खूप कठीण आहे, त्यामुळे थोडा वेळ लागेल; परंतु सर्व काही सुरळीत होईल.’

अतुल गुप्ता म्हणाले, ‘देशाच्या विकासात, तसेच सामाजिक आणि आर्थिक सुधारणांमध्ये मध्यस्थ म्हणून सीएची भूमिका महत्त्वाची आहे. सीएची गुणवत्ता अबाधित करण्यासाठी ‘आयसीएआय’कडून सतत उपक्रम राबविण्यात येतात. डिजिटल हब, युडीआयएन यासारखे व्यासपीठ उभारले आहेत. सीए आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी नवीन तंत्रज्ञानाचा मेळ घालत अभ्यासक्रम अद्ययावत केला जात आहे. नियमित मार्गदर्शन सत्र, कार्यशाळा घेण्यात येत आहेत. सीएचे काम, सेवा स्वयंचलीत आणि चांगली करण्यासाठी ‘आयसीएआय’ प्रयत्नशील आहे.’

‘जीएसटी’ अधिक सुलभ करण्यात सनदी लेखापाल महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मत चंद्रशेखर चितळे यांनी व्यक्त केले. ऋता चितळे व अभिषेक धामणे यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. नेहा फडके, ऐश्वर्या गुंदेचा, पूजा महेश्वरी, राजश्री सहल यांनी सूत्रसंचालन केले. काशिनाथ पठारे यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZYHCF
Similar Posts
‘लेखापालन क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध’ पुणे : ‘सनदी लेखापाल झाल्यानंतर नोकरी, स्वतंत्र व्यवसाय आणि इतर अनेक क्षेत्रांत काम करता येते. लेखापालन क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कठोर मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर ‘सीए’सारख्या आव्हानात्मक परीक्षेत यश संपादन करू शकतो,’ असे मत ज्येष्ठ सनदी लेखापाल आणि दी इन्स्टिट्यूट
‘आयसीएआय’च्या ‘सीसीएम’पदी चंद्रशेखर चितळे पुणे : दि इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कमिटीवर पुण्यातील सीए चंद्रशेखर चितळे यांची ‘सेंट्रल कौन्सिल मेंबर’ म्हणून, तर सीए आनंद जाखोटिया, सीए अरुण आनंदागिरी व सीए यशवंत कासार यांची ‘रिजनल कौन्सिल मेंबर’ म्हणून निवड झाली आहे. पुणे शाखेतून एक सीसीएम आणि तीन आरसीएम निवडून
‘आयसीएआय’ पुणे शाखेची चार पारितोषिकांवर मोहर पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेला २०१८ मधील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय पातळीवर दोन, तर विभागीय पातळीवर दोन असे चार पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर ‘आयसीएआय पुणे’ला दुसरी सर्वोत्तम शाखा आणि सर्वोत्तम विद्यार्थी (विकासा) शाखा
‘सीए फाउंडेशन डे’निमित्त २८ जूनला विविध कार्यक्रम पुणे : सनदी लेखापाल स्थापना दिवसानिमित्त (सीए फाउंडेशन डे) दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २८ जून २०१९ रोजी बिबवेवाडीतील ‘आयसीएआय’ भवन येथे गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम होणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language